शैक्षणिक पात्रतेसोबत शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेतील गुणाच्या आधारेच शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल.
विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती व Screening Test मध्ये मिळालेले गुण या आधारावर शिष्यवृत्ती देण्याचा अंतिम निर्णय आकार फाउंडेशनचा राहील.
Covid-19 च्या कारणांमुळे प्रवेशपरीक्षा Online स्वरुपात घेतली जाईल. काही अपरिहार्य परिस्थितीत परीक्षा, निकाल व Batches सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय आकार फाउंडेशनचा राहील. याबाबत www.aakarfoundation.org/scholarship या संकेतस्थळावरच माहिती दिली जाईल.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, अनाथ, दिव्यांग, कोरोनामुळे अनाथ झालेले पाल्य, या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
प्रवेश परीक्षेसाठी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियमित Offline Batches आकार फाउंडेशन पुणे व नागपूर केंद्रावर १५ जानेवारी पासून सुरु होतील. सदर Batches Online स्वरुपात सुद्धा उपलब्ध राहतील.